100 दिवसांतील कामगिरीबाबत सर्वेक्षण, 80 टक्क्यांहून अधिक जनता समाधानी असल्याचा आमदाराचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी आमदारकीला 100 दिवस पूर्ण झाल्याबद्दल एक सर्वेक्षण केलं. यात 87.15 % मतदारांनी तांबे यांच्या आतापर्यंतच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलं. 6.25% लोकांनी काम बरं असल्याचे नमुद केले. तर उर्वरित 6.6 % लोकांनी कामात सुधारणा व्हावी, यासाठी मत नोंदवल्याचा दावा सत्यजीत तांबे यांनी केला आङे. कोणत्याही मोठ्या कंपनीत तिमाही आढावा घेतला जातो. राजकीय क्षेत्रात तर लोकप्रतिनिधीही लोकांना उत्तरदायी असतात. त्यामुळे हे असं सर्वेक्षण व्हायलाच हवं असं तांबे यांचं म्हणणं आहे. लोकांच्या सुचनांबाबत गांभीर्याने विचार करून त्याकडे लक्ष केंद्रीत करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले.