आभाळमाया – आकाशगंगेच्या मध्यभागी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक

खगोलशास्त्राचं संशोधन जसजसं पुढे सरकतं तशा नवनव्या गोष्टी समजून घेता येतात. आपली आकाशगंगा किंवा ‘मिल्की-वे’ ही दीर्घिका आपल्या सूर्यासारख्या सुमारे 200 अब्ज ताऱ्यांनी भरलेली आहे. आपल्याला एका रात्रीत नुसत्या डोळ्यांनी सुमारे 6000 तारे दिसतात ते आपल्याच आकाशगंगेमधले. चाळिसेक वर्षांपूर्वी अगदी मुंबईजवळच्या वांगणीहून आकाशगंगेचा पट्टा सुंदर दिसायचा. आता सर्वत्र, रात्र, प्रकाशमान झाली आहे. पृथ्वीवरच्या मानवी वस्तीचा जवळपास सर्व भाग आता रात्रीची दिवाळी साजरी करीत असतो. असं हे प्रकाशाचं पृथ्वीव्यापी होणं वाढतच जाणार आणि उद्या माणूस चंद्र-मंगळावर गेला तरी तिथेही दिवे लावणार! (चांगल्या अर्थाने!) याला आता पर्याय शोधायचा तर न्यूझीलंडमध्ये आहे तशी ‘टेकापो’सारखी खगोल अभ्यास गावं तयार करावी लागतील. त्यांना प्रकाशाच्या आणि इतर प्रदूषणापासून दूर ठेवावं लागेल. तिकडे हिमालयात डॅन्ले येथे आहे तशी आपल्या सह्याद्रीमध्ये जागा असेल तर ‘खगोलग्राम’ करण्याचा विचार व्हायला हवा.

विषय निघाला तो आकाशगंगेवरून. तिचा विस्तार 1 लाख प्रकाशवर्षं एवढा आहे. अशा या आकाशगंगेचं वास्तुमान किती असावं? चकित होण्याइतपं, पण गणितात सांगता येईल असं. आधी आपल्या पृथ्वीचं वस्तूमान पाहू. ते आहे 59736 वर 20 शून्यं ठेवली तर जेवढे किलो होतील तेवढं! सूर्य आपल्या पृथ्वीचा जनक तारा. त्याचं वस्तुमान पृथ्वीपेक्षा प्रचंड असणार हे स्पष्टच आहे. कारण सूर्याच्या व्यासरेषेवर 1100 पृथ्वी सामावू शकतील, असा त्याचा आकार. त्याचं वस्तुमान पृथ्वीच्या 333000 पट म्हणजे किती याची कल्पना करा आणि कल्पनेच्या पलीकडे गवसेल ते आपल्या सूर्यासारखे अब्जावधी तारे असलेल्या आकाशगंगेचं वस्तुमान, ते आहे 180 वर 12 शून्यं ठेवली तर सूर्याच्या वस्तुमानाला त्या संख्येने गुणल्यावर जे उत्तर मिळेल ते. जाऊ द्या. अतिप्रचंड संख्या येईल एवढंच एवढ्यासाठी लक्षात ठेवा की त्यामुळे आपल्या विश्वाच्या विराटतेचा अंदाज येऊ शकेल.

एवंगुणविशिष्ट आकाशगंगेच्या मध्यभागी आहे एक अतिशक्तीशाली कृष्णविवर. त्यासंबंधी थोडी माहिती आपण पूर्वीही घेतली आहे. धनू राशीच्या तारकासमूहात ‘सॅजिटेरिअस (धनु) ए’ असं आपल्या आकाशगंगेच्या केंद्राशी असलेल्या कृष्णविवराचं वैज्ञानिक नाव. 40 लाख सूर्यांचं वस्तुमान एकत्र केल्यावर होईल एवढं त्याचं वस्तुमान आहे. या कृष्णविवराचं जे ‘इव्हेंट होरायन’ आहे तिथली प्रकाशाची रिंग (कडं) वगळता मधल्या कृष्णगाभ्याचा व्यास सुमारे 38 दशलक्ष (3 कोटी 80 लाख) किलोमीटर एवढा आहे. (पृथ्वीचा अवघा 12800 किलोमीटर यावरून तुलना करा). धनु राशीच्या परिघावर ‘बटरफ्लाय’ तारकागुच्छाजवळ असा त्याचा ‘पत्ता’ सांगता येईल.

आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी प्रचंड कृष्णविवर असावं अशी जाणीव शास्त्रज्ञांना पूर्वीच झाली होती. अनेकजण त्यावर संशोधन करीत होते. 1254 मध्ये जॉन व्रेअस, हेन्विंग आणि सीन मॅट यांना आकाशगंगेच्या पेंद्राशी असलेल्या तीव्र गुरुत्वाकर्षणाची जाणीव झाल्यानंतर, प्रगत होत गेलेल्या रेडिओ-खगोलशास्त्राने त्यांना मदत केली. तिथून येणाऱया तीव्र रेडिओस्रोतांचा अभ्यास केल्यावर 1982 मध्ये सूर्याच्या वस्तुमानाच्या प्रचंड आकाराचं कृष्णविवर असल्याचं झालं. अनुमान, अभ्यास, संशोधन आणि सिद्धांत अशी वैज्ञानिक प्रक्रिया कोणत्याही निष्कर्षापर्यंत येण्यासाठी असावी लागते. कोणाला काही ‘वाटतं’ अशा गोष्टींना तेथे वाव नसतो. विज्ञान ही दंतकथा नव्हे तर सत्यकथा असते.

आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी कृष्णविवर असल्याच्या संशोधनाबद्दलचं खगोल भौतिकीचा नोबेल पुरस्कार रेनहार्ड आणि जेन्झेल या संशोधकांना 2020 मध्ये मिळाला. अर्थात यामागे त्यापूर्वी रेडिओ खगोलशास्त्रात काम करणाऱया अनेक संशोधकांचे प्रयत्नही सामील होतेच. कार्ल जॅनस्की यांचं नाव रेडिओ खगोलशास्त्राच्या संदर्भात आवर्जून घेतलं जातं. त्यांना रेडिओ खगोलशास्त्राचे पितामह म्हणतात.

तीव्र रेडिओ स्रोतांमुळे शोध लागलेल्या आणि ज्याभोवती आपली अख्खी सूर्यमाला सेपंदाला 220 किलोमीटर या वेगाने गरगरत असते त्या कृष्णविवराचा फोटो मात्र तुलनेने अगदी अलीकडे घेतला गेला. अवकाशी दुर्बिणींचा सिलसिला 1990 च्या दशकात ‘हबल’ने सुरू केला. आता तर ‘जेम्स वेब’ ही इन्फ्रारेड पह्टाग्राफी करणारी महाकाय दुर्बिणही अवकाशात कार्यरत आहे. 2022 च्या मे महिन्यात या कृष्णविवराचा पहिला पह्टो प्रसिद्ध झाल्यावर संशोधकांच्या गणिती अभ्यासाचा दृश्य पुरावा सापडला. 2016 मध्ये 100 वर्षांपूर्वी भाकित केलेल्या गुरुत्वीय लहरी ‘पकडता’ आल्यावर झाला होता तसाच आनंद संशोधकांना झाला.

आपल्या आकाशगंगेतील या कृष्णविवरापासून आपली आकाशगंगा एकतृतीयांश अंतरावर आहे. परंतु या पेंद्रकाच्या अगदी जवळचा तारा त्याभोवती 1 अब्ज 26 कोटी किलोमीटर अंतरावरून फिरतो. (पृथ्वी-सूर्य अंतर केवळ 15 कोटी किलोमीटर आहे.) दीर्घिकेच्या केंद्रकापासून अनेक तारे आणि कदाचित अनेक ग्रहमाला अब्जावधी किलोमीटरवरून परिक्रमा करीत आहेत. हे कृष्णविवर आपली आकाशगंगा गिळंकृत करू शकणार नाही हा मोठाच दिलासा.

[email protected]