
टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी लोकांना घेऊन जाणारी टायटन पाणबुडी रविवारी दुपारपासून बेपत्ता आहे. गुरुवारी सकाळपर्यंत पाणबुडीचा ऑक्सिजन संपण्याची शक्यता आहे. पाणबुडी शोधण्यासाठी यूएस आणि कॅनडातील 3 सी-130 हरक्यूलिस विमाने पाण्याखालील रोबोटसह पाठवण्यात आली आहेत. याशिवाय एक झ्-8 विमान आणि 2 कॅनेडियन सरफेस जहाजेदेखील शोध मोहिमेत सहभागी आहेत.



























































