पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा ‘मिशन गुजरात’, अहमदाबादेत अमेरिकेचे नवीन वाणिज्य दुतावास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले नेहमीचे ‘मिशन गुजरात’ कायम ठेवले आहे. मायक्रॉन टेक्नॉलॉजीकडून सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये उभारला जाणार असून, त्यासाठी एकूण तब्बल 2.75 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार आहे. अमेरिकन सरकार हिंदुस्थानात दोन नवीन वाणिज्य दुतावास (कॉन्सुलेटस) अहमदाबाद आणि बंगळुरू येथे सुरू करणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे. मोदींनी न्यूयॉर्क येथे सेमीपंडक्टर चीप निर्मितीमधील जायंट पंपनी मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे सीईओ संजय मेहरोत्रा तसेच अप्लाइड मटीरियलचे सीईओ गॅरी डिकर्सन, जीई एरोस्पेसच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याशी यावेळी करारही करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदींचे वॉशिंग्टन येथे आगमन झाले. व्हाईट हाऊस येथे पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा होणार असून, यावेळी स्पेस, टेक्नॉलॉजी, संरक्षणसह अनेक करारांवर स्वाक्षरी होईल.

काय आहेत करार?

हिंदुस्थानच्या नॅशनल सेमीकंडक्टर मिशनमध्ये मायक्रॉन टेक्नॉलॉजी गुजरातमध्ये 825 दक्षलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे, असे कंपनीने जाहीर केले. तसेच पेंद्र आणि गुजरात सरकारही यात गुंतवणूक करेल. त्यामुळे गुजरातमध्ये उभ्या राहणाऱ्या या प्रकल्पात एकूण गुंतवणूक 2.75 अब्ज डॉलर्सची असणार आहे. या सेमीपंडक्टर प्रकल्पाचा पहिला टप्पा 2025ला सुरू होईल. मायक्रॉन पंपनीकडून  थेट पाच हजार नवे रोजगार आणि 15 हजार कम्युनिटी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

अमेरिकेच्या जीई एरोस्पेस आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्यात करार झाला. ‘जीई’कडून लढाऊ विमाने एफ-414चे इंजिन हिंदुस्थानात बनणार आहे.

अमेरिकन सरकारचे हिंदुस्थानात दिल्लीत उच्चायुक्त कार्यालय आहे. तसेच मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद असे चार वाणिज्य दुतावास अनेक वर्षांपासून आहेत. आता आणखी दोन नवीन वाणिज्य दुतावास अहमदाबाद आणि बंगळुरू येथे सुरू होणार आहेत, अशी माहिती व्हाईट हाऊसच्या आधिकाऱ्यांनी दिली.

पुढच्या वर्षी संयुक्त अंतराळ मोहीम

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ आणि हिंदुस्थानच्या ‘इस्त्र्ााs’मध्ये करार झाला. 2024 मध्ये संयुक्त अंतराळ मोहीम आखली जाणार आहे. चंद्रावर जाण्यासाठी नासाने तयार केलेल्या आर्टेमिस करारावर हिंदुस्थान स्वाक्षरी करणार आहे.