
कोणतीही महिला असो पण आपल्या सुखाच्या संसारात तिसऱ्या महिलेला बिलकूल खपवून घेत नाही. ती आकांड तांडव करे, तमाशे करेल पण पतीला घरात सवत आणू देणार नाही. मात्र उत्तर प्रदेशमधील प्रयागराज शहरात एका महिलेने तिच्या छोट्या बहिणीचेच तिच्या पती सोबत लग्न लावून दिले आहे. आता हे तिघे मिळून एकाच घरात एकत्र संसार करणार आहेत. त्यामुळे भाओजी आणि मेहुणीचे हे लग्न सध्या शहरात चर्चेत आले आहे.
प्रयागराजमधील शंकरगढ भागात राहणाऱ्या राजकुमारचे रुमी नावाच्या महिलेसोबत लग्न झाले होते. रुमीचे तिची बहिण भारतीवर खूप प्रेम आहे. तिच्यापासून ती लांब राहू शकत नाही. तसेच तिच्या कुटुंबाकडे भारतीचे लग्न लावून देण्या इतपत पैसेही नव्हते. त्यामुळे रुमीने तिचे लग्न आपल्याच पतीसोबत लावून देण्याचे ठरवले. राजकुमार देखील लग्नसाठी तयार झाला. त्यानंतर रुमीने त्यांचे एका देवळात लग्न लावले.
या लग्नासाठी गावातील काही मंडळी देखील हजर राहिली होती. बहिणीनेच स्वत:च्या छोट्या बहिणीला आपली सवत म्हणून घरात आणल्याने अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या होत्य़ा. मात्र या लग्नाने रुमी व भारती खूप खुष आहेत. त्या दोघी यापुढे एकाच घरात राहणार असून ते तिघं एकत्र संसार करणार आहेत.


























































