
मध्य रेल्वेने गेल्या वर्षभरात आपल्या दैनंदिन गाडय़ांची वाहतूक नियमितपणे सुरू ठेवतानाच तब्बल 822 हॉलिडे स्पेशल ट्रेन चालवण्याची विक्रमी कामगिरी केली आहे. या गाडय़ांच्या माध्यमातून तब्बल 31 लाख 78 हजार प्रवाशांची वाहतूक केली असून त्या माध्यमातून रेल्वेला 283 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ म्हणून मध्य रेल्वेकडून दरवर्षी विशेष गाडय़ा चालवल्या जातात. मागील वर्षी सुमारे 750 विशेष गाडय़ा चालवल्या होत्या. त्यामध्ये 2022-23 मध्ये 822 एवढय़ा विक्रमी गाडय़ा चालवल्या आहेत. या गाडय़ांनी 31 लाख 78 हजार 143 प्रवाशांनी प्रवास केला आहे. या विशेष गाडय़ा महाराष्ट्र, बिहार, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम, बरौनी, आंध्र प्रदेश आणि केरळसह विविध लोकप्रिय स्थळांसाठी चालवण्यात आल्या आहेत, ज्यात उन्हाळी सुट्टी, आषाढी एकादशी, वेलंकन्नी, गणपती, धम्मचक्र, दिवाळी, कार्तिकी एकादशी, ख्रिसमस, होळी या सणांचा समावेश आहे.





























































