गुणवंतांच्या पाठीवर ‘आयआयबी’ची कौतुकाची थाप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या 24 वर्षांपासून डॉक्टर आणि इंजिनीअर घडविणारी फॅक्टरी म्हणून नावलौकिक असलेल्या ‘आयआयबी इन्स्टिटय़ूट’ने नीट-2023 मध्येही देदीप्यमान निकाल दिला आहे. नुकताच आयआयबीने नीट-2023 मधील आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जल्लोषात सत्कार केला आहे.

आयआयबीच्या विद्यार्थ्यांनी नीट-2023 परीक्षेत उत्तुंग यश मिळविले आहे. यामध्ये पलक जाजू, सायली महिंद्रकर आणि पलक शहा या विद्यार्थिनींनी 720 पैकी 705 गुण प्राप्त केले. तसेच शिवम माहुरे 700, ज्ञानेश्वर जाधव 700, साक्षी वजीरगावे 700, अर्जुन लिंगदळे 700, उझेर रुलानी 697, भारती देशमुख 696, अनुष्का भारसवाडकर 696 या विद्यार्थ्यांनीही उत्तुंग यश संपादन केले. फिजिक्समध्ये पलक जाजू, उझेर रुलानी, सर्वेश हटकर, रामप्रसाद पाटील, सायली कदम, हाफिज सोहेल या विद्यार्थ्यांनी तर केमिस्ट्रीमध्ये सायली महिंद्रकर आणि तेजस पोरे या विद्यार्थ्यांनी 180 पैकी 180 गुण मिळविले आहेत. बायोलॉजी विषयात पलक शहा, भारती देशमुख, ज्ञानेश्वर जाधव, अक्षय मिसाळ, गणराज नल्लावार आणि शिवानी जाधव या विद्यार्थ्यांनी 360 पैकी 360 गुण मिळविले आहेत.

आयआयबी टीमच्या दूरदृष्टीतून केलेल्या नियोजनाचे हे फलित आहे, असे आयआयबीचे मुख्य कार्यकारी संचालक दशरथ पाटील यावेळी म्हणाले. सत्कार सोहळय़ाला आयआयबीचे सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक आणि आयआयबीची टीम उपस्थित होती.