तापमानवाढीचा रेड अलर्ट; 3 जुलै जगातील सर्वात उष्ण दिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक तापमानवाढीची धोक्याची घंटा वाजली आहे. 3 जुलै हा जगातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. अल निनो आणि कार्बन डायऑक्साईडमुळे ही तापमान वाढ झाली असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

तापमानवाढीला अनेक घटक कारणीभूत आहेत. मानवी कृत्य हे एक प्रमुख कारण आहे. जिवाश्म इंधन जाळल्याने दरवर्षी 40 अब्ज टन कार्बन डायऑक्साईड तयार होतो. या सर्वांचा एकत्रित परिणाम 3 जुलै रोजी सरासरी जागतिक तापमान 17 डिग्री सेल्सिअसच्या पार गेले. ऑगस्ट 2016 मध्ये 16.92 डिग्री सेल्सिअस इतके सरासरी जागतिक तापमान नोंदवले गेले होते. जून हा जगातील सर्वात उष्ण महिना ठरला आहे.

शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता

या वर्षाच्या सुरुवातीलाच शास्त्रज्ञांनी जमीन आणि समुद्रातील वाढत्या तापमानाबाबत चिंता व्यक्त केलेली आहे. स्पेन आणि आशियातील अनेक देशांमध्ये वसंत ऋतूमध्ये विक्रमी उष्णता जाणवली आहे. या आठवडय़ात चीनमध्येही उष्णतेचीही लाट आली असून तापमान 35 डिग्रीच्या वर पोहचले आहे. दक्षिण अमेरिकेतही उच्च तापमानाची नोंद झाली आहे. ‘ग्रॉथम इन्स्टिटय़ूट फॉर क्लायमेंट चेंज अॅण्ड एन्व्हायरमेंट’चे शास्त्रज्ञ फ्रेडिक ओटो यांनी ही धोक्याची घंटा असल्याचे सांगितले आहे.