
>> सुदाम कुंभार (निवृत्त प्राचार्य तथा समुपदेशक)
मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम देणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीची यादी विद्यापीठाच्या परिपत्रकाप्रमाणे 6 जुलै रोजी जाहीर झाली आहे. पारंपरिक कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील पदवी अभ्यासक्रमांबरोबर स्वयंअर्थसहाय्यित महाविद्यालयांमध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
बीएससी ह्यूमन सायन्स
प्रवेशासाठी विज्ञान शाखेतून फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय घेऊन उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत असलेली महाविद्यालये तसेच एनएमआयएमएस अभिमत विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ इत्यादी ठिकाणी प्रवेश घेऊ शकता. उच्च पदवी प्राप्त केल्यानंतर फार्माकोव्हिजिलन्स ऑफिसर, डेटा सायन्स ऍनालिस्ट, डेटा सायन्स ऍनालिटिक्स स्पेशालिस्ट होऊ शकता.
बीएससी हॉस्पिटॅलिटी स्टडीज
बीएससी हॉस्पिटॅलिटी उमेदवारांना हॉटेल मॅनेजर, हाऊसकीपिंग मॅनेजर, हॉटेल डेव्हलपमेंट मॅनेजर, रेस्टॉरंट मॅनेजर, सेल्स मॅनेजर आणि बारटेंडर हे अलीकडील पदवीधरांसाठी खुले रोजगार आहेत. तसेच मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी ऍण्ड न्यूट्रिशन, जय हिंद कॉलेज मुंबई, याशिवाय कला शाखेतून ट्रव्हल ऍण्ड टुरिझम मॅनेजमेंट, टुरिझम मॅनेजमेंट तसेच इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी ऍण्ड टुरिझम मॅनेजमेंट हॉस्पिटॅलिटी, बॅचलर ऑफ टुरिझम ऍडमिनिस्ट्रेशन आणि ऍडव्हान्स डिप्लोमा इन ट्रव्हल ऍण्ड टुरिझम इत्यादी अभ्यासक्रमांनासुद्धा तुम्ही पसंती देऊ शकता.
रिटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम
- बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रिटेल मॅनेजमेंटमध्ये काही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
- रिटेल मॅनेजमेंटमधील सहा महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स.
- रिटेल मॅनेजमेंटमधील एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम.
- बीएससी इन रिटेल मॅनेजमेंट तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम.
- एमबीए इन रिटेल मॅनेजमेंट पाच वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम इत्यादी.
ग्रीन हाऊस मॅनेजमेंट
मुंबईच्या रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये औद्योगिक क्षेत्रातील विविध गरजा विचारात घेऊन या अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे.
- एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम.
- दोन वर्षांचा ऍडव्हान्सड पदविका अभ्यासक्रम.
- बॅचलर ऑफ वोकेशनल डिग्री इन ग्रीन हाऊस मॅनेजमेंट तीन वर्षांचा अभ्यासक्रम.
- अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील बारावी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक.



























































