
एकीकडे निसर्ग कोपला आहे, दुसरीकडे सरकारची मदत नाही आणि तिसरीकडे प्रशासकीय यंत्रणा शेतकऱ्यांशी मुजोरपणे वागत आहे. या सर्व शुक्लकाष्ठात शेतकरी अडकलेला आहे. या अडचणीत सापडलेल्या बळीराजाला राज्य सरकार कधी मदत देणार, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केला
सुनील प्रभू यांनी विधानसभेत नियम 293 च्या चर्चेत भाग घेताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे. ‘अल निनो’चा प्रभाव, सरासरीपेक्षा कमी पाऊस, अवकाळी पावसाचे संकट आणि आता दुबार पेरणीचे संकट अशा परिस्थितीत शेतकऱ्याला आधार देण्याचे सरकारचे महत्त्वाचे काम आहे.
आतापर्यंत सुमारे 47.13 लाख हेक्टर जमिनीवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. या शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याची मागणी सुनील प्रभू यांनी केली.
























































