मुंबईत 224 इमारती अतिधोकादायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहरात 35, पश्चिम उपनगरात 126 आणि पूर्व उपनगरात 65 इमारती अशा 224 इमारती अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याचे आढळून आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली.

मुंबईतील निवासी व अनिवासी जुन्या व मोडकळीस आलेल्या अतिधोकादायक इमारतींबाबत जितेंद्र आव्हाड व अन्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मुंबई महापालिकेने अशा इमारतींचे सर्वेक्षण केले होते. मुंबई महापालिकेने अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या 226 इमारतींपैकी 104 इमारतींमधील रहिवाशांनी इमारत रिकामी न करण्याबाबत न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळवले आहेत. अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना इमारत रिकामी करण्यासाठी वेळोवेळी नोटिसा देऊन स्थानिक पोलिसांच्या सहाय्याने या इमारतींचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून इमारत रिकामी करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती लेखी उत्तरात दिली आहे.