
गृहरक्षक दलातील जवानांना (होमगार्डना) पुन्हा 180 दिवस काम मिळणार आहे. त्याबरोबरच त्यांना कवायत भत्ता दिला जाणार असून दर तीन वर्षांनी नोंदणी करण्याचा नियम रद्द करण्यात येणार आहे.
वेतनासह अन्य सुविधांसाठी 350 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लक्षवेधीला दिली. महाराष्ट्र गृहरक्षक दलातील जवानांनी वर्षभर काम मिळावे यासाठी पावसाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर गृहरक्षक दलाच्या विविध 17 मागण्यांसंदर्भात महादेव जानकर यांनी लक्षवेधीच्या सूचनेच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता.


























































