सत्तेसाठी भाजप काहीही करू शकतो! सत्यपाल मलिकांचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सत्तेसाठी हे लोक कोणत्याही  थराला जाऊ शकतात. जे पुलवामा घडवू शकतात ते काहीही करू शकतात. राम मंदिरावर हल्ला करतील, भाजपच्या बडय़ा नेत्यांची हत्या घडवून आणतील. सत्तेसाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात’, असे मलिक यांनी म्हटले आहे, असा सनसनाटी गौप्यस्फोट जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले आहे.

सत्यपाल मलिक यांचा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. अवघ्या 40 सेकंदांच्या या व्हिडीओची देशभरात तुफान चर्चा आहे. ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भुषण यांनी हा व्हिडीओ शेअर करताना मलिक यांनी भयंकर गोष्ट सांगितल्याचे म्हटले आहे. ‘नरेंद्र मोदी 2024 मध्ये पंतप्रधानपद टिकवण्यासाठी काय करू शकतात. याबाबत त्यांचे एकेकाळी निकटवर्तीय राहिलेले जम्मू-कश्मीर आणि गोव्याचे राज्यपालपद भूषविलेल्या सत्यपाल मलिकांचे खळबळजनक दावे’ असे ट्विट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस या पेजवरून करण्यात आले आहे.

2024 मध्ये जिंकणार नाही; आताच निघून जावे

मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले. मलिक म्हणाले, ‘त्यांना संसदेची अजिबात पर्वा नाही. ते चुकीच्या रस्त्यावर आहेत. त्यामुळे त्यांनी आताच निघून जावे. पराभवानंतर जाणे चांगले दिसेल का? मी खात्रीने सांगतो 2024 मध्ये ते जिंकणार नाहीत.’