रणवीर सिंग नवा ‘डॉन’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिग बी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्यानंतर बॉलीवूडला नवा डॉन मिळाला आहे. त्याचे नाव रणवीर सिंह आहे. होय, ‘डॉन 3’ मध्ये रणवीर सिंह प्रमुख भूमिका साकारणार आहे. ‘डॉन 2’ चे दिग्दर्शन करणाऱया फरहान अख्तरने ‘डॉन 3’ चा टीझर नुकताच शेअर केला आहे. यामध्ये रणवीरचा जबरदस्त लुक दिसत आहे. ‘मैं हूं डॉन… 11 मुल्कों की पुलिस ढूंढती है मुझे…’ असा रणवीरच्या आवाजातील डायलॉग टीझरमध्ये ऐकू येतो.

1978 मध्ये अमिताभ बच्चन यांनी चंद्रा बारोट दिग्दर्शित ‘डॉन’ या चित्रपटात डॉनची भूमिका साकारली. या चित्रपटामधील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यानंतर 2006 मध्ये आणि 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डॉन 1’ आणि ‘डॉन 2’ मध्ये शाहरुखनेच डॉनची भूमिका साकारली. आता ‘डॉन-3’ चित्रपटामध्ये रणवीर सिंह डॉन ही भूमिका साकारणार असून तो आता बॉलीवूडचा तिसरा डॉन ठरला आहे.