शिस्तबध्द गुंतवणुकीने करोडपती बना!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> चंद्रहास रहाटे

जी व्यक्ती आयुष्यात लवकर जागी होते ती लवकर धनवान होऊ शकते. कधी आपण झोपून राहतो त्यामुळे आपल्याला सूर्येदय पाहताच येत नाही. अशीच काहीशी अवस्था गुंतवणूक उशिरा सुरू करणाऱया व्यक्तींची होते.

आयुष्यात गुंतवणुकीला जो लवकर सुरुवात करील तो लवकर करोडपती होईल. जर प्रॅक्टिकली विचार केला तर वयाच्या 25 व्या वर्षी एखादी व्यक्ती शिक्षण संपवून नोकरी किंवा व्यवसाय सुरू करते. या व्यक्तीला जर 40 व्या वर्षी करोडपती व्हायचे असेल तर गुंतवणुकीमध्ये जोखीम घेऊन आपले उद्दिष्ट साकारता येते. या व्यक्तीने म्युच्युअल फंडाच्या इक्विटी एसआयपीमध्ये गुंतवणूक केली तर आजपासून पंधरा वर्षांनी, पंधरा टक्के परताव्याने, पंधरा हजार दरमहा गुंतवणुकीच्या माध्यमातून वयाच्या चाळीसाव्या वर्षी करोडपती बनण्याचे स्वप्न त्याला पूर्ण करता येईल. पण वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी सुरुवात केली तर हेच स्वप्न वयाच्या साङ्गाव्या वर्षी पूर्ण होईल.

चाळीसाव्या वर्षी करोडपती बनण्यासाठी त्याने वयाच्या तिसाव्या वर्षी सुरुवात केली तर पाच वर्ष उशिरा गुंतवणूक सुरू केल्याची किंमत किती आहे तेही जाणून घेऊ या. जेथे वयाच्या पंचविसाव्या वर्षी सुरुवात केल्यामुळे दरमहिना फक्त 15000 रुपये गुंतवणूक करावी लागणार होती तेथे त्याला दरमहिना 36000 रुपये गुंतवणूक करावी लागेल. आहे की नाही प्रचंड तफावत?

आतापर्यंत आपण जी चर्चा केली ती काही फिक्स परताव्याची गुंतवणूक नाही, त्यामुळे आपण 15 टक्के संभाव्य परताव्यावर उदाहरणे मांडली. हाच जर परताव्याचा दर कमी झाला तर आपण किती वर्षात करोडपती बनणार याची चर्चा पुढील लेखात करू. गुंतवणूक करताना नियोजन व रिस्क मॅनेजमेंट महत्त्वाचे आहे.

[email protected]
(लेखक आर्थिक सल्लागार आहेत)