
तुळजापूरला देवदर्शनासाठी निघालेल्या नगर जिह्यातील पारनेर तालुक्यातील महिला भाविकांवर आज पहाटे सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळजवळ काळाने घाला घातला. भाविकांच्या इको कारने पुढे चाललेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात चार महिला भाविकांचा मृत्यू झाला, तर अन्य सहाजण जखमी झाले आहेत.
हिराबाई रामदास पवार (वय 75), कमलाबाई मारुती वेताळ (वय 60), द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय 40), चालक आदमअली मुनावर अली शेख (वय 37, सर्व रा. रांजणगाव मशीद, ता. पारनेर) अशी अपघातात ठार झालेल्या भाविकांची नावे आहेत.
पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील महिला भाविक इको कारने तुळजापूर येथे दर्शनासाठी निघाले होते. आज पहाटे सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर यावली गावाजवळ मोहोळ हद्दीतील हॉटेल सरगम येथे इको कारने पुढे निघालेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये चालकासह तीन महिला भाविकांचा मृत्यू झाला. तर बाळी बापू पवार (वय 27), छकुली भीमा पवार (27), साई योगीराज पवार (वय 7), मंदाबाई नाथा पवार (वय 52), सुरेखा भारत मोरे (वय 45), बायजाबाई रामदास पवार (वय 60) हे भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापूर सिक्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मोहोळ पोलीस ठाण्यातील टोलनाक्याचे पेट्रोलिंग ऑफिसर मल्लिकार्जुन बळीराम बजुलगे यांनी अपघाताची माहिती दिली. अपघातात मृत्यू पाकलेले भाकिक पालकमंत्री राधाकृष्ण किखे-पाटील यांचे निकटकर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे.
































































