
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ‘एक्स’वर (ट्विटर) वापरकर्त्यांना सहजपणे नोकऱ्यांची माहिती मिळणार आहे. जगभरात बेरोजगारांची मोठी संख्या आहे. त्या पार्श्वभूमीवर कंपनीने जॉब हायरिंग फिचर सुरू केले आहे. त्यामुळे वेगवेगळय़ा कंपन्यांना आपल्याकडील नोकरभरतीची माहिती एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ठेवता येणार आहे. परिणामी गरजूंना सहजपणे नोकऱ्यांची माहिती मिळू शकणार आहे.
























































