
गडचिरोलीतील 2019 च्या नक्षलवादी हल्ल्यातील आरोपी कैलास रामचंदानीचा जामीन अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने नुकताच फेटाळला. रामचंदानीला यापूर्वी 2021 मध्ये जामीन नाकारण्यात आला होता. मात्र मागील दोन वर्षांत परिस्थितीत कोणाताही बदल झालेला नाही, असे निरीक्षण नोंदवत विशेष न्यायाधीश राजेश कटारिया यांनी रामचंदानीचा जामीन अर्ज धुडकावला. गडचिरोलीतील कुरुखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी स्फोट घडवला होता. त्यात 15 जवान शहीद झाले होते, तर एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.





























































