नगर शहरात उड्डाणपुलावर भीषण अपघात, एक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहरात उड्डाणपुलावर भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली आहे. या अपघातामध्ये एक जण मयत झाला असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

रविवारी सकाळी 6.45 वा. दरम्यान स्टेट बँक चौक ते चांदणी चौक या रस्त्यावरील कॉर्नरवर हा अपघात झाला. होंडा शाईन नं MH -20-CV -4098 या वाहनावरून पती-पत्नी हे त्यांच्या दुचाकीवरून संभाजीनगरहून पुण्याकडे जात होते. त्यांच्या वाहनाचा वेग खूप असल्यामुळे त्यांना ते वाहन नियंत्रित करता आले नाही.

उड्डाणपुलाच्या वळणावर वाहन कठड्याला घसरून दुचाकी चालक पुलावरून खाली पडला तर त्याची पत्नी जखमी झाली. तिला एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताची माहिती समजताच स्थानिक रहिवाशांसह प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, या अपघातात अत्यवस्थ झालेला दुचाकी चालक जागेवरच गतप्राण झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या मयत दुचाकी चालकाची ओळख अद्याप पटलेली नाही.