
मिंधे सरकारच्या काळात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सफाई कर्मचाऱयाने प्रशिक्षणार्थी एअर हॉस्टेसचा गळा चिरल्याची घटना पवई येथे घडली. रूपल ओगरे असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी सफाई कर्मचारी विक्रम अथवालला पवई पोलिसांनी अटक केली.
रूपल ही मूळची छत्तीसगडची रहिवाशी होती. तिची बहीण पवईच्या मारवाह येथील एन.जी. सोसायटीमध्ये राहत होती. रूपलला एका विमान कंपनीत प्रशिक्षणार्थी एअर हॉस्टेस म्हणून मुंबईत काम करीत होती, तर विक्रम हा गेल्या सात महिन्यांपासून त्या सोसायटीमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होता. तो नळ दुरुस्ती आणि सफाई कामानिमित्त रूपलच्या घरात पूर्वी जात असायचा. बहीण गावी गेल्यामुळे रूपल एकटीच घरात होती. रविवारी सकाळी तिच्या घरचा नळ नादुरुस्त झाल्याचा फायदा उठवत विक्रम घरात घुसला आणि त्याने जुन्या भांडणाचा राग ठेवत तिचा गळा चिरला.
























































