
मिंधे सरकारच्या काळात राज्याच्या राजकारणाचे सुरू असलेले अधःपतन, पालिकेत सुरू असलेला प्रचंड घोटाळा आणि मुंबईकरांच्या पैशांची सुरू असलेली लूट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कांदिवली पूर्व विधासभा शाखा क्र. 24 वतीने आयोजित केलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ उपक्रमाला पोईसरमध्ये नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि संकल्पनेतून मुंबईत ठिकठिकाणी राज्य सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात आणि मनमानी कारभाराविरोधात ‘होऊ द्या चर्चा’ हा उपक्रम राबवला जात असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. विभागप्रमुख अजित दादा भंडारी यांच्या मार्गदर्शनाने ‘होऊ द्या चर्चा’ याला आजपासून पोईसर परिसरात सुरुवात केली. यावेळी सत्तापिपासू राजकारण, शाश्वत विकासकामांचा अभाव, पर्यावरण हानी, महागाई, बेरोजगारी, दुर्लक्षित आरोग्य व्यवस्था, प्रशासनाची मुजोरी, अराजकीयता तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात झालेली कामे, कोरोनापासून केलेले संरक्षण, आदित्य ठाकरे यांची शाश्वत विकासाची दूरदृष्टी, शिवसेना आणि मुंबईच नाते इत्यादी विषयांवर चर्चा केली. यावेळी विधानसभा संघटक कृष्णा मुळीक, उपविभाग समन्वयक धर्मदास सावंत, शाखाप्रमुख प्रकाश शिंदे, शाखा समन्वयक नारायण आंबेडे, सहकार्यालयप्रमुख वसंत खेतल, उपशाखाप्रमुख भरत हरकुळकर, उपशाखाप्रमुख विनोद मोरजकर, उपशाखाप्रमुख सुंदर कनोजिया, उपशाखाप्रमुख विजय म्हातलेकर, गटप्रमुख तरुण मकवाणा, दीपक लाड आदी उपस्थित होते.


























































