नालासोपाऱ्यात तरुण बॉडी बिल्डरचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नालासोपाऱ्यातील एका 27 वर्षीय बॉडी बिल्डरचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने या बॉडी बिल्डरचं निधन झालं आहे. अजिंक्य कदम असं त्याचे नाव असून त्याला सोमवारी सकाळी छातीत दुखायला लागलं होतं. अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला कुटुंबियांनी तातडीने महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्याचे दुर्दैवाने निधन झाले. शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणारा आणि अनेक बक्षिसे जिंकणारा म्हणून अजिंक्य प्रसिद्ध होता. अजिंक्य अविवाहित होता आणि त्याच्यापाठी आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. अजिंक्यच्या असं अचानक जाण्याने कुटुंबियांना आणि मित्र परिवाराला धक्का बसला आहे