वर्ल्ड कपचा फिव्हर आता नवरात्रोत्सवातही, पवईत दुर्गोत्सवात साकारणार लॉर्ड स्टेडियमची प्रतिकृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसी वर्ल्ड कपचे यजमानपद यंदा हिंदुस्थानकडे आहे. वर्ल्ड कपचा फिव्हर आता नवरात्रोत्सवातही दिसणार आहे. पवई येथील बंगाली वेलफेअर असोसिएशन यंदा अनोख्या पद्धतीने दुर्गोत्सव साजरा करणार आहे. या उत्सवात भाविकांना भक्तीसोबत क्रीडा आणि संस्कृतीचे दर्शन घेता येणार आहे. 19 ते 24 ऑक्टोबर दरम्यान पवई येथे हा दुर्गोत्सव आयोजित केला जाणार आहे. त्यामुळे भाविकांना भक्तीबरोबर क्रिकेटची अनोेखी पर्वणी मिळणार आहे.

पवई बंगाली वेलफेअर असोसिएशनच्या वतीने ‘डिव्हाईन इनिंग’ ही अनोखी संकल्पना राबवली आहे. यामुळे भाविकांना उत्सवाबरोबरच क्रिकेट आणि संस्कृतीचा अनोखा मिलाप पाहता येणार आहे. अध्यक्ष सौरभ मित्रा यांच्या म्हणण्यानुसार, डिव्हाईन इनिंगची संकल्पना हिंदुस्थानची खिलाडूवृत्ती आणि संस्कृती या दोघांचे सुंदर मिलाफ आसणार आहे. त्यामुळे यंदा दुर्गोत्सवाबरोबरच क्रिकेटचा उत्साह एकत्र साजरा करणार आहेत. त्यासाठी या उत्सवात ज्या मैदानात आपण पहिल्यांदा विश्वचषक जिंकला त्या लॉर्ड स्टेडियमची प्रतिकृती साकारली जाणार आहे.