अफगाणिस्तानचा संघ जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात  5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी बुधवारी अफगाणिस्तानचा संघ जाहीर झाला. हशमतुल्लाह शाहिदीकडे या  संघाची धुरा सोपविण्यात आली आहे. आशिया चषक स्पर्धेत खेळणाऱया चार खेळाडूंना विश्वचषक संघातून डच्चू देण्यात आला आहे. याचबरोबर तीन नव्या चेहऱयांना संधी देण्याचा धाडसी निर्णय अफगाणिस्तानच्या संघनिवड समितीने घेतला आहे. आई अखिलेश, गुलाबदीन नैब, करीम जनात, एस. अशरफ व नूर अहमद या पाच खेळाडूंना संघातून डच्चू दिला आहे.यातील चार खेळाडू हे आशिया चषक स्पर्धेतही खेळले होते. याचबरोबर इकरम अली खिल, नबर अहमद व नवीन उल-हक या नव्या चेहऱयाना लॉटरी लागली आहे.

अफगाणिस्तानचा विश्वचषक संघ ः हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इब्राहिम जादरान, रहमानुल्लाह गुरबाज (यष्टिरक्षक), रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकरम अली खिल, रियाझ हसन, अब्दुल्लाह ओमरजई, राशिद खान, अब्दुल रहमान, नबर अहमद, गुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, नवीन उल-हक.