
सध्या विविध कारणांमुळे चर्चेत राहणारी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तसेच संबंधित मंडळाच्या अध्यक्षांना त्याबाबत नोटिस बजावण्यात आली आहे.
गौतमी पाटील हिचा नगर या ठिकाणी दिनांक 28 सप्टेंबर रोजी सावेडी उपनगरातील मृत्युंजय प्रतिष्ठानच्या वतीने सायंकाळी सहा ते 10 या वेळामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनाकडे प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद नाकाडे यांनी परवानगी मागितली होती. गेल्या आठवड्यापासून गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाची तयारी प्रतिष्ठानच्या वतीने जोरदारपणे सुरू होती. मात्र तोफखाना पोलीस ठाण्याने या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असून त्यांनी या प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनंत नाकाडे व उपाध्यक्ष आतिफ शेख यांना कलम 149 प्रमाणे नोटिस बजावून या कार्यक्रमाची परवानगी नाकारली असून या परिसरामध्ये विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान घरगुती पद्धतीचे विसर्जन गणपतीचे होत असते त्यामुळे या भागामध्ये गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असते असे कारण या नोटीसमध्ये देण्यात आलेले असून कायदा संस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये अशी प्रशासनाची भूमिका असल्याचेही त्यामध्ये म्हणले आहे.































































