
अयोध्येतील राममंदिराच्या पुजाऱ्यांना दिवाळीनिमित्त खास भेट मिळाली आहे. रामललाच्या पुजाऱ्यांच्या वेतनात सहा महिन्यात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. श्री राम जन्मभऊमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने ही वाढ केली आहे. रामललाच्या मुख्य पुजाऱ्यांचे वेतन 25 हजार रुपयांवरून 32 हजार 900 करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इतर पुजारी आणि सेवकांच्या वेतनातही वाढ करण्यात आली आहे. तसेच राम मंदिरातील पुजाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांसारख्या सुविधाही मिळणार आहेत. त्यात आरोग्यविमा, टीए, डीए आणि भत्ते या सुविधांचा समावेश आहे. मंदिरातील प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
रामललाच्या मंदिराच्या पुजारी आणि सेवकांच्या वेतनात सहा महिन्यात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. मुख्य पुजाऱ्यांचे वेतन 25 हजारावरून 32 हजार 900 करण्यात आले आहे. तर 20 हजार रुपये मिळणाऱ्या पुजाऱ्यांना 31 हजार वेतन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ट्रस्टकडून पुजारी आणि सेवकांना सरकारी कर्मचाऱ्यांसारखी सुविधा देण्यात येणार आहे. त्यात त्यांना आरोग्य विमा, आजारपणातील तपासणी, प्रवास भत्ता,निवसा भत्ता आदी सुविधा देण्यात येणार आहे. वेतनवाढ आणि सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतल्याबाबत पुजारी आणि सेवकांनी समाधान व्यक्त केले असून ट्रस्टचे आभार मानले आहेत.
























































