पाथर्डी बहिण भावाचा शेततलावात बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sunk_drawn

शेततळ्यात बुडून सख्या बहीण भावाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पाथर्डी तालुक्यातील आल्हणवाडी शुक्रवारी दुपारी घडली आहे. या घटनेत इयत्ता तिसरी मध्ये शिकणारी पायल संदिप पांढरे व दुसरीतील सुरज संदिप पांढरे या चिमुकल्या बहिण भावाचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.शाळेतील शिक्षक व वसतिगृहाच्या अधीक्षकांच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.

आल्हणवाडी येथील निवासी आश्रम शाळेत पायल आणि सुरज हे बहिण भाऊ शिक्षण घेत होते. दुपारी दोन वाजता शाळेची मधली सुट्टी होते त्यावेळी हे बहिण भाऊ शाळेच्या पाठीमागे असलेल्या शेततळ्याकडे गेले, त्यानंतर या दोघांचा मृतदेह शेततळ्यात आढळून आला. तेथील स्थानिकांच्या व शिक्षकांच्या मदतीने या दोघांचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले. पांढरे कुटुंबीय हे पारनेर तालुक्यातील रहिवासी आहे. पायल व सुरज यांचे मामा पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे राहत असून या मुलांचे आई वडील उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेरगावी असतात म्हणून या मुलांना आल्हणवाडी येथील आश्रम शाळेत शिक्षण व राहण्यासाठी दाखल केले होते.

या दुर्दैवी घटनेने गावासह पंचक्रोशीत हळूहळू व्यक्त होत आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.