
रिलायन्स जिओने पारंपारिक कारचे स्मार्ट वाहनांमध्ये रूपांतर करण्यासाठी JioMotive हे नवीन उपकरण बाजारात लाँच केले आहे. कारला नवीन तंत्रज्ञानाशी जोडून त्यांना स्मार्ट बनवणाऱ्या या उपकरणाची किंमत 4,999 रुपये आहे. या डिव्हाइसमध्ये चोरीपासून संरक्षण करण्यासाठी लोकेशन ट्रॅकिंग आणि अलर्ट यांसारखी वैशिष्ट्ये देखील दिली आहेत. ज्या गाड्यांमध्ये फॅन्सी फीचर्स इन-बिल्ट नाहीत त्यांच्यासाठीही हे उपकरण फायद्याचे असणार आहे.
बहुतेक कारमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सारखी अनेक वैशिष्ट्य आहेत. तुम्ही ते तुमच्या स्मार्टफोनशी सहजपणे कनेक्ट करून त्यातील अनेक वैशिष्ट्ये ऑपरेट करू शकता. नवीन JioMotive OBD अॅडॉप्टर वापरून तुम्हाला याचा फायदा घेता येईल असा कंपनीचा दावा आहे.
Jio Motive कसे काम करते-
Jio Motive हे एक प्लग-एंड-प्ले डिवाइस आहे. ज्याच्या इंस्टॉलेशनसाठी कोणत्याही मैकेनिकची गरज नाही. हे डिवाइस लावणे अगदी सोपे आहे. गुगल प्ले स्टोर किंवा अॅपल अॅप स्टोरच्या सहायाने यूजर Jio Things हा अॅप डाउनलोड करुन हे डिव्हाइस त्यांच्या कारमध्ये स्वतः इंस्टॉल करू शकतात. यासाठी यूजरला आपला Jio चा नंबर अॅप्लिकेशनला लिंक असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला डिवाइस इंस्टॉलेशनसाठी कोणतीही समस्या येत असेल तर कंपनीच्या टोल फ्री नंबरवर: 1800-896-9999 कॉल करु शकता आणि याबाबतची माहिती मिळवू शकता.
तुम्ही तुमच्या कारमध्ये हे डिव्हाइस इंस्टॉल केल्यास, JioMotive बॅटरीचे आरोग्य, इंजिन लोड, कूलंटचे तापमान यासह इतर महत्त्वाची माहिती पुरवते. कंपनीच्या म्हणण्यानुसार ते 200 पेक्षा जास्त इंजिन डायग्नोस्टिक कोड प्रदान करते, ज्यामुळे वापरकर्ता त्याच्या वाहनाच्या इंजिनवर आणि कामगिरीवर बारीक नजर ठेवू शकतो. या उपकरणाच्या वापरामुळे वाहनाच्या चोरीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




























































