
मुंबईत धुळीमुळे प्रदूषण वाढल्याचे समोर आल्यामुळे पालिकेकडून रस्त्यांवर पाण्याचा फवारा मारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी सध्या टँकर आणि प्रिंक्लर मशीनचा वापर करण्यात येत आहे. मात्र टँकरसाठी मोठय़ा प्रमाणात खर्च येत आहे. त्यामुळे मुंबईत दिल्लीच्या धर्तीवर दर तीन दिवसांनी कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती आज पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिली. दिल्लीत प्रस्तावित असलेला प्रयोग यशस्वी ठरल्यास मुंबईतही हा प्रयोग करण्यात येईल, असे ते म्हणाले.
मुंबईत वाढत्या प्रदूषणामुळे पालिका प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये बांधकामे बंदिस्त करून काम करणे, प्रिंक्लर बसवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय आता मुंबईत बाहेरून येणाऱया वाहनांची वॉटर जेट प्रे मशीनने चाके धुण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यासाठी मुंबईच्या दहिसर, मुलुंड आणि ऐरोलीच्या इंट्री पॉइंटवर गाडय़ांची चाके धुण्यासाठी वॉटर जेट प्रे मशीन बसवण्यात येणार आहेत. नाक्यावर गाडय़ा थांबवण्यात येणार नाहीत तर चालत्या गाडय़ांच्या चाकावर मशीनने पाणी मारले जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
कोस्टल रोड प्रकल्पाला पालिकेची नोटीस
कोस्टल रोड प्रकल्पात नियमांचे पालन करण्यात यावे प्रदूषण नियंत्रणासाठी खबरदारी घ्यावी, अशी नोटीस पालिका प्रशासनाकडून कोस्टल रोडला देण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईच्या रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी पालिकेकडून रस्त्यावर पाणी फवारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दररोज दिवशी 650 किमी रस्ते धुतले जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. मुंबईत एकूण 2050 किमीचे रस्ते असून त्यापैकी प्रमुख रस्ते धरून 650 किमीचे रस्ते धुण्यासाठी टॅँकर भाडय़ाने घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात मुंबईत दररोज 1000 किमी रस्ते धुण्यासाठी नियोजन केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.



























































