वायुप्रदूषणप्रकरणी विकासकावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात वायुप्रदूषण रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. वायुप्रदूषणप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी एका विकासकाविरोधात पहिला गुन्हा नोंद केला आहे.

मुंबईत वाढते वायुप्रदूषण पाहता मुंबई उच्च न्यायालयानेदेखील सरकारी यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली होती. नुकतेच पालिकेत मुंबईतील सर्व प्राधिकरणांच्या अधिकाऱयांची बैठक झाली. या बैठकीनंतर नियमावलीचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई करण्याचे ठरले. नियमाचे उल्लंघन करताना हद्दीचा वाद न करता थेट कारवाई करण्यात यावी अशी अधिकाऱयांना सूचना देण्यात आली होती. भरारी पथके तयार करून कारवाई करण्यास सुरुवात केली.

सांताक्रुझ येथे एका विकासकाची साईट सुरू आहे. काम सुरू असताना तेथे 25 फूट पत्रा लावला नव्हता. पत्रा न लावताच त्या विकासकाने काम सुरू केले होते. लोकसेवकाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिका अधिकाऱयाने सांताक्रुझ पोलीस ठाण्यात धाव घेतली. अधिकाऱयाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम 291 नुसार गुन्हा दाखल केला.