रमाधाम हा वृद्धाश्रम नाही तर दुसरं बालपण फुलवणारी वास्तू! उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माँसाहेबांनी खोपोलीमध्ये ‘रमाधाम’चे रोपटे लावले. मात्र हा केवळ वृद्धाश्रम नाही तर दुसरं बालपण फुलवणारी वास्तू आहे, असे प्रतिपादन करतानाच आजी-आजोबांच्या सेवेचे व्रत रमाधामच्या माध्यमातून अखंड सुरूच राहील, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी रमाधामला आज भेट देऊन पाहणी केली. तसेच तेथील कामकाजाबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनही केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी रमाधामच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

शिवसेनाप्रमुखांनी 1990 मध्ये खोपोलीत ‘रमाधाम’ वृद्धाश्रम सुरू केले. येथील हिरवीगार झाडी.. स्वच्छ व मोकळी हवा आणि आल्हाददायक वातावरण यामुळे अनेक आजी-आजोबा येथे रमले. वृद्धांना रमाधामच्या निमित्ताने जणू आपले दुसरे घरच लाभले आहे. येथील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तेथे भेट देऊन पुढील वाटचालीबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी मला रमाधामची जबाबदारी तू घे, असे सांगितल्यावर मी इथे यायला सुरुवात केली. चंदूमामा वैद्य व माँसाहेब हेदेखील स्वतः कामात लक्ष घालायचे. आता या वास्तूमध्ये भव्य इमारत उभी राहिली असून वृद्धांसाठी सर्व सोयी केल्या आहेत.

शहरापासून काही अंतरावर शिवसेनाप्रमुखांनी निसर्गरम्य वातावरणात मुद्दामच हा वृद्धाश्रम बांधला. नाहीतर त्यांनी मुंबई, पुणे पिंवा लोणावळ्यातदेखील तो उभारला असता. मुंबईमध्ये खूप प्रदूषण आहे. आपण मोकळेपणा गमावलेला आहे. तो पुन्हा मिळावा यासाठीच बाळासाहेबांनी वृद्धाश्रमाच्या ठिकाणी अनेक झाडे लावली. तसेच हिरवळ फुलवली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना नमूद केले. ते म्हणाले, आपण जबाबदारी घेतल्यापासून वृद्धाश्रमात विविध सुविधा निर्माण केल्या. प्रशस्त लॉन, वाचनासाठी हॉल, औषधोपचार अशा सर्व व्यवस्था उभारल्या असून त्यांची काळजी घेतली आहे.

रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते अनंत गीते, शिवसेना नेते-खासदार राजन विचारे,  शिवसेना नेते-आमदार भास्कर जाधव, रवींद्र वायकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, साईनाथ दुर्गे, उपनेते भाऊ कोरगावकर, पराग डाके, उपनेत्या राजूल पटेल, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, मनोहर भोईर, अनिल नवगणे, सुरेंद्र म्हात्रे, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रभाकर म्हात्रे, विश्वास थळे, विभागप्रमुख आमदार रमेश कोरगावकर, उदेश पाटेकर, अजित भंडारी, सुरेश पाटील, महेश सावंत, आशीष चेंबूरकर, संतोष शिंदे, महेश पेडणेकर, नितीन सावंत, प्रवीण महाले, माजी महापौर श्रद्धा जाधव, युगंधरा साळेकर, अश्विनी मते, प्रज्ञा सकपाळ, रंजना मेस्त्र्ााr, खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे आदी उपस्थित होते.

शनिवार, रविवारी येऊन मनोरंजन करा!

वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना एकटेपणा जाणवणार नाही यासाठी शनिवार पिंवा रविवारी सुट्टीच्या दिवशी काही मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करावेत, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली. ते म्हणाले की, आता सर्व सुविधा एका इमारतीत आल्या असून कुणाला वाचन करायचे असेल अथवा पॅरम खेळायचा असेल तर भरपूर जागा आहे. नुसतं मनोरंजन नव्हे तर त्यांना आधार द्यायला हवा. इथे येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या चिंता विसरता आल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.