
उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने धावत्या इलेक्ट्रिक बसमध्ये कंडक्टरवर चॉपरने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. हे दृश्य पाहून बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडालाय त्यानंतर आरोपीने तिथून पोबारा केला होता. मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.
लारेब आशमी असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना प्रयागराज शहरातील औद्योगीक परिसरातील असल्याचे बोलले जात आहे. घटनेच्या काही वेळानंतर लारेब हाशमीला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी विद्यार्थी लारेब हाशमी याच्या सांगण्यावरून आरोपींनी पोलिसांवर शस्त्र जप्त करण्यासाठी नेत असताना हल्ला केला. पोलीसांच्या पथकावर हल्ला करत पळण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. जी त्याच्या पायाला लागली. ज्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर बस कंडक्टर गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये आरोपी आणि कंडक्टरमध्ये तिकीटावरुन वाद झाला. यावेळी संतापलेल्या विद्यार्थ्याने धारदार शस्त्र काढून कंडक्टरवर वार केले. त्यानंतर त्यांचा बचाव करण्यासाठी अन्य एक कंडक्टचर धावून आला मात्र त्याच्यावरही हल्ला करण्यात आला. हल्ला केल्यानंतर आरोपी शस्त्रासह फऱार झाला. बोलले जात आहे की, हल्ला करताना आरोपीने धार्मिक घोषणा दिल्या होत्या. त्याने हल्ल्यानंतर एक व्हिडीओ बनवला आणि इस्लामचा अपमान केल्यामुळे त्या कंडक्टरला मारल्याचे सांगितले .व्हिडीओमध्ये त्याने शस्त्रही दाखवले आहे.



























































