
>> सुहास मळेकर
त्या कंपनीत दिवाळी सणाच्या निमित्ताने सर्वांनी पारंपरिक कपडे परिधान करून यायचे ठरले असल्यामुळे मुली तर खूपच उत्साहात होत्या.
‘‘तुम तो दादी माँ लगती हो.’’ साडी नेसून आलेल्या एकीला चारचौघांत एका सहकाऱयाने कमेंट दिली आणि इतर सहकारी हसले. पुढल्या दहा मिनिटांत साडी बदलून तिने आधीच घातलेला ड्रेस पुन्हा घातला तेव्हा ती हिरमुसलेली होती.
‘‘खूप छान दिसतेय साडी तुला.’’ हे एक गोड काwतुकाचे वाक्य बोलून तुमचे काही नुकसान होणार नसते. पण अशा एका वाक्यावरून तुम्ही कसे आहात, तुम्ही कोणत्या वर्तुळात वावरत असता याचा साधारण अंदाज येतो. याउलट काwतुकात आणि आनंदी वातावरणात वाढलेली मुले लगेच लक्षात येतात. काही जणांना कुठे काय बोलायचे याचे भान नसते. चांगले असो की वाईट, अशा एका वाक्यात प्रचंड ताकद असते.
एका विद्यापीठात पह्टोग्राफीसाठी प्रवेशपरीक्षा उत्तम रीतीने पास झालेल्या एका विद्यार्थ्याला ‘‘तुझ्याकडे पॅमेरा नाही, तू अभ्यासक्रम पूर्ण करू शकत नाहीस’’ म्हणून पहिल्या दिवशीच वर्गात बसताना सहज नाकारले गेले. स्वतंत्रपणे जिद्दीने तो मुलगा पुढे व्यावसायिक यशस्वी पह्टोग्राफर बनला अशी एक गोष्ट नव्याने वाचनात आली.
एका वाक्याला जोडून एखादा घडलेला प्रसंगसुद्धा कायम स्मरणात राहून तापट माणूस सूडबुद्धीने पेटून उठतो, तर एखादा हळवा असेल तर संपूर्ण कोलमडून जातो. याउलट एखादा तरुण मनात ईर्षा उत्पन्न होऊन जिद्दीने कोणीतरी मोठा झालेला अशी उदाहरणे अवतीभवती पाहायला मिळतात. अशा एका वाक्याने कितीतरी आयुष्ये ढवळून निघाली आहेत.
एक वाक्य कधी सुविचार बनून येते, कधी घोषणा, ललकारी, हाक किंवा साद म्हणून कानावर पडते, तर कधी एखादे वाक्य कानांत तप्त तेल ओतल्यागत मनाला-हृदयाला घर पाडते. तुमचे एक वाक्य कुणाचे तरी संपूर्ण आयुष्य काळवंडून टाकते, तर कुणाचे आयुष्य उजळवून टाकते. तेव्हा बोलताना, कुठलीही प्रतिक्रिया देताना तरी विचार करणे आवश्यक आहे.
आपण इतिहास चाळला तर लक्षात येईल अशा एकेका वाक्याने स्फूर्ती घेऊन वीरांनी पराक्रमाची शर्थ केली आहे, तर एकाच वाक्यात दिलेले वचनसुद्धा पाळून कुणी लढता लढता वीरमरण पत्करले आहे.
एकेका वाक्याने पेटून उठून चळवळी उभ्या राहिल्या. एका वाक्याने क्रांती झाली. एका वाक्याने उठाव झाले. अशी कितीतरी एकेक चांगली प्रेरक वाक्ये शोधता येतील.
दुर्दैवाने अगदी अलीकडचीच उदाहरणे पहा, तुम्ही पाहिले असेल काहीही विचार न करता केलेले वाक्य अंगाशी येऊन कुणाची कॉलर पकडायला लावते, क्वचित एखादे भांडणे मिटवायलाही मदत करते.
समजून घेणे, वाईटाकडे दुर्लक्ष करणे या गोष्टीला आपण ‘एखाद्याकडे समजूतदारपणा आहे’ म्हणतो, पण प्रत्येक वेळी समोरचा कसा असेल हे सांगता येत नाही. तोंडातून बाहेर पडलेल्या शब्दांची तुलना धनुष्यातून सुटलेल्या बाणाबरोबर केली जाते. कारण एकदा तो पकडीतून सुटला की, पुन्हा मागे घेता येत नाही. अशा एका वाक्याने कुणाचे भले झालेय, तर कुणाचे वाईट. कोणी घर सोडलेय, कोणी आत्महत्या केलीय, कोणी अपमानीत झाला, कोणी सूड घेतला, तर याउलट कोणी पाठीवर थाप मारून आयुष्य घडवले आहे. त्यामुळे हे एकच वाक्य उच्चारताना खूप विचारपूर्वक उच्चारायला हवे. मग तुम्ही रागीट स्वभावाचे असा, अतिसंवेदनशील हळवे असा की, तथाकथित मोकळय़ा मनाचे असा.
रागात, आनंदाच्या मूडमध्ये किंवा मस्करीत अतिउत्साहाने म्हणा उच्चारलेले एकच वाक्य समोरच्याच्या काळजाचा ठाव घेत असते याची जाणीव असू द्या. कधी ते तुमच्या लगेच लक्षात येते, पण तोपर्यंत बाण सुटलेला असतो, तर कधी समोरच्यासाठी महत्त्वाचे असले तरी तुम्ही उच्चारलेले तुमच्या खिजगणतीतही नसते.
मात्र तुमचेच वाक्य तुम्हाला कधीतरी कुठूनतरी कळते तेव्हा चांगले वाक्य असेल तर ठीक, अन्यथा तुमच्या हातात माफी मागण्याव्यतिरिक्त काहीच उरलेले नसते.
























































