
ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आता टेलिकॉम कंपन्यांमध्ये नवे नियम लागू होणार आहेत. टेलिकॉम कंपन्यांसाठी 1 जानेवारीपासून नवे नियम लागू होणार आहेत. नवे सिम खरेदी करण्यासाठी आता पेपरलेस केवायसी करावी लागणार आहे. त्यामुळे बनावट सीमकार्ड, आर्थिक फ्रॉड सारख्या प्रकरणांवर लगाम बसणार आहे.
केंद्र सरकारने नव्या टेलिकॉम नियमांची घोषणा केली आहे. मात्र अंमलबजावणी करण्यासाठी उशीर लागत होता. नव्या नियमांनुसार, सरकारने सिमकार्ड विक्रेत्यांची पडताळणी करणे अनिर्वाय केली आहे. याव्यतिरिक्त बल्क सिम कनेक्शनचे सिस्टम रद्द करण्यात आली आहे. त्याच्याजागी बिझनेस कनेक्शन देण्याचा नियम असेल, ऑनलाईन फ्रॉडपासून वाचण्यासाठी हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. नव्या नियमांनुसार सरकारने टेलिकॉम कंपन्यांसाठी फ्रेन्चायजी, वितरक आणि पॉईण्ट ऑफ सेल एजंट्सची नोंदणी अनिवार्य केले आहे. टेलिकॉमच्या डिलर्स आणि एजंट्सना नोंदणीसाठी 12 महिन्यांचा कालावधी मिळेल. 1 जानेवारीपासून डिजिटल नो युवर कस्टमर म्हणजेच ई-केवायसी लागू केली जाणार आहे. सिम खरेदी करणाऱ्यांना डिजिटल व्हेरिफिकेशन सिस्टममधून जावे लागेल. जर डिलरने असे केले नाही, तर त्याच्यावर 10 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. सिम बदलण्याप्रकरणी एसएमएस फॅसिलिटी सुरु होण्यासाठी 24 तासाच्या आता व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करावी लागणार.
आधारकार्डसंदर्भातील फसवणूक रोखण्यासाठी सरकारने नियमावलीत काही बदल केले आहेत. आधारकार्डचा कोणी चुकीच्या पद्धतीने वापर करु नये, त्यासाठी प्रिंटेड आधारचा क्युआर को़ड स्कॅन करुन डेमोग्राफी डिटेल्स घ्यावे लागतील. सिम कार्ड बंद होण्याच्या 90 दिवसांपर्यंत हा नंबर अन्य कोणाला दिला जाणार नाही.





























































