
मी सामान्य कुटुंबातील असून अजित पवारांना काऊंटर करणे मला योग्य वाटत नाही. माझ्या विजयात प्रत्येक कार्यकर्त्याचा वाटा होता. त्यांनी भूमिका का बदलली मला माहीत नाही. मी आहे त्याच ठिकाणी आहे. दादांचा एवढा दरारा आहे तर त्यांनी केंद्र सरकारला बोलावं आणि कांदा निर्यातबंदी उठवावी, असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.
अमोल कोल्हेंना निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे-पाटलांनी जिवाचं रान केलं, पण यावेळी पाडणार म्हणजे पाडणारच, असं उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी म्हणाले. त्यानंतर मंगळवारी खासदार अमोल कोल्हे शरद पवारांच्या भेटीसाठी मोदी बागेतील कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोल्हे म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषिमंत्री असताना या मतदारसंघात आठ धरणे बांधली, येथे फळबागा निर्माण झाल्या, त्यांच्यामुळे रांजणगाक, चाकणसारख्या एमआयडीसी अािण मगरपट्टासारखा आयटी पार्क उभा राहिला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याविषयी जनतेमध्ये आस्था आहे.
माझा ना कारखाना, ना कंपन्या
मी माझ्या पक्षासोबत आहे. मी कुठे गेलो आहे? आमदारांनी कोणकोणत्या कारणांमुळे भूमिका बदलली, हे भविष्यात समजेल. माझा ना कारखाना आहे, ना कंपन्या आहेत, ना माझ्यावर चौकशी आहे. दादांनी काल एका चित्रपटाचा उल्लेख केला. त्या चित्रपटातील संवादाबाबत बोलायचे झाल्यास शिवाजी महाराजांना दख्खनची सुभेदारी द्यावी, असे दिल्लीपतीच्या मनात होते. दख्खनची सुभेदारी ही स्वराज्याच्या कैकपट होती, मात्र तेक्हा सुभेदारी स्कीकारली नाही आणि तत्त्वांशी महाराजांनी तडजोड केली नाही, असेही अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.


























































