
सोने-चांदीच्या दरांमध्ये आज किंचीत वाढ झाली आहे. गुडरिटर्न्स या संकेतस्थळानुसार 14 जानेवारी म्हणजे आज सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 58,000 रुपये प्रति तोळा आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 63,270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नईत सोन्याचा दर 58,450 रुपये आहे. यासोबतच, चांदीच्या दरातही सातत्याने वाढ होत असून, आज चांदीची किंमत 76,500 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. सोन्यासह चांदीतही तेजी पाहायला मिळाली.. चांदीच्या किंमतीत 500रुपयांची वाढ झाली आहे.यामुळे आज एक किलो चांदीची किंमतीत 500 रुपयांची वाढ होऊन चांदीचा भाव 76 हजार 500 रुपये झाली आहे. चैन्नईमध्ये चांदीचा भाव 78 हजार आहे. पुण्यात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63270 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर नाशिकमध्ये 63300 रुपये प्रति 10 ग्रॅम, नागपूरमध्ये 63270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर कोल्हापूरमध्ये सोने 62870 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चालू जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि जागतिक राजकीय तणावामुळे सोन्याचा भाव यावर्षी 2024 मध्ये प्रति 10 ग्रॅम 70,000 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचेल, असे ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (GJC) ने म्हटले आहे.



























































