रवींद्र वायकर यांना ईडीचे समन्स, चौकशीसाठी उद्या हजर राहण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांना आज समन्स पाठवले. येत्या मंगळवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना ईडीने दिले आहेत. जोगेश्वरी भूखंडप्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी आमदार वायकर यांच्या घरावर धाड टाकली होती. ईडीचे अधिकारी अनेक तास वायकर यांच्या घरात कागदपत्रांची तपासणी करत होते. यापूर्वी एकदा ईडीने वायकर यांना समन्स पाठवले होते. त्यावेळी काही कारणास्तव त्यांना चौकशीला जाता आले नव्हते. त्यामुळे ईडीने आज पुन्हा समन्स बजावले आहे.