जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना पाठिशी राहील, वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील तरुणांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे त्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आपल्या पाठीशी सतत उभा राहील असे प्रतिपादन युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी मंचर येथील अण्णासाहेब आवटे कॉलेज च्या युवासेना कॉलेज कक्ष फलक अनावरण प्रसंगी केले.
मंचर येथील अण्णासाहेब आवटे कॉलेज च्या युवासेना कॉलेज कक्ष फलक अनावरण प्रसंगी देसाई बोलत होते.यावेळी ओंकार अनिल वायाळ यांची युवासेना कॉलेज अध्यक्ष पदी तसेच आशिष थोरात यांची कार्याध्यक्ष पदी, उपाध्यक्ष पदी यशराज कराळे, हिरामण गभाले, ओंकार गावडे, प्रणव मेंगडे,ऋषीं सोमवंशी, अथर्व बेंडे आदीची निवड झाल्याबद्दल देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी युवासेना वि.भा. सचिव अविनाश बलकवडे, युवासेना विस्तारक विशाल ससाणे, शिवराज भोर, कॉलेज कक्ष निरीक्षक नमिता नाईक, आंबेगाव तालुका तालुकाप्रमुख दत्ता गांजाळे, निवडणूक समन्व्यक अरुण नाना बाणखेले, मंचर शिवसेना शहर प्रमुख विकास जाधव, माऊली पाटील तसेच युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रसन्न लोखंडे, गणेश आढळराव, युवासेना तालुकाप्रमुख सुरज हिंगे पाटिल, विवेक पिंगळे, हेमंत एरंडे, योगेश शिंदे, अक्षय कुलकर्णी,अमोल बाणखेले, विद्यार्थी सेना अध्यक्ष आंबेगाव तालुका अतुल हिंगे, समाधान हिंगे व अण्णासाहेब आवटे एकता संघांचे अध्यक्ष कुणाल बाणखेले व धनंजय बांगर विद्यार्थी व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.