
राजापूर पोलिस ठाण्याच्या व्हराड्यांमध्ये घुसून बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये कुत्र्याची शिकार करून शिकार केलेला कुत्र्याच्या मानेला धरून बिबट्या चक्क पोलिस ठाण्यातून बाहेर पडत असल्याची थरारक घटना या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाली आहे.
रात्री तीन-साडेतीन वाजता बिबट्याने पोलिस ठाण्यात वर्हांड्यामध्ये घुसून कुत्र्याची शिकार केल्याची घटना पोलिस ठाण्यात परिसरातील सीसीटीव्हीच्या कॅमेर्यामध्ये कैद झाली आहे. शिकारीच्या घटनेने पोलिस कर्मचार्यासह या परिसरातील लोकांमध्ये भीती वातावरण पसरले आहे.बिबट्याने पोलीस ठाण्यात घूसून कुत्र्याची शिकार केलेला व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.




























































