मंगळावर 65 फूट खाली सापडले पाणी; नासाच्या रोव्हरच्या डेटाने केली पुष्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगळावर पाणी असल्याचे उघड झाले आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था पर्सर्व्हरन्स रोव्हरच्या डेटाने याबाबतची पुष्टी केली आहे. मंगळाचा सर्वात धोकादायक पृष्ठभाग असलेल्या जाजिरो क्रेटरवर पर्सव्हरन्स रोव्हर उतरले. येथील खडकांचे नमुने घेण्यात आले. तसेच जमिनीखालील पाण्याचा शोध घेण्याचे प्रयोगही करण्यात आले.

त्यानुसार मंगळाच्या पृष्ठभागाच्या 65 फूट खाली मातीच्या कणांमध्ये आर्द्रता आढळून आल्याची माहिती शास्त्रज्ञांना मिळाली आहे. जाजिरो क्रेटर या मंगळाच्या पृष्ठभागावर पूर्वी एक मोठा तलाव होता. त्यामुळे मंगळावर कधी जीवसृष्टी असेल तर त्याची चिन्हे जीवाश्मांच्या रूपात सापडण्याची आशा शास्त्रज्ञांना आहे. दरम्यान, पाण्याची पुष्टी करण्यासाठी आणि येथे जीवन आहे का हे शोधण्यासाठी 18 फेब्रुवारी रोजी मंगळावर पर्सव्हरन्स मार्स रोव्हर उतरले होते. हे रोव्हरच्या इतिहासातील सर्वात अचूक लँडिंग असल्याचा दावा नासाने केला होता.