
नोएडा विकास प्राधिकारणाने अधिग्रहित केल्याने बदल्यात भरपाई आणि इतरत्र भूखंड देण्याच्या मागणीवरून शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. संघटनांनी मोर्चाची घोषणा केली असून गुरुवारी त्या मोर्चाला आणखी गती मिळाली. नोएडा प्राधिकरणाविरोधात धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. संसदेला घेराव घालून आपल्या मागण्या मांडणार असल्याची घोषणाही संघटनांनी केली आहे. दरम्यान, या मोर्चामुळे उत्तर प्रदेश-दिल्ली महामार्गावर प्रचंड गर्दी झाली आहे. शेतकरी आंदोलनामुळे नोएडा एक्सप्रेस वे बंद करण्यात आला आहे. दरम्यान, या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने कलम 144 लागू करण्यात आलं आहे.




























































