
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला. त्यावर प्रतिक्रीया देताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘एखादा कुत्रा गाडीखाली आला तरी विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील”, असे अत्यंत बेजबाबदार वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
श्वान गाडीखाली येणे आणि राजकीय वैरी संपवणे यातला फरक जनतेला चांगलाच समजतो!! गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी आज तुम्ही एका राजकीय गुन्ह्याला एका मुक्या प्राण्याच्या अपघाताचे उदाहरण देत तुच्छ लेखू पाहत आहात का?
तुमच्या हातात असलेली गृह खात्याची व्यवस्था निष्क्रिय ठरत आहे, की… pic.twitter.com/NUIJqDQG6T
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 9, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. ”श्वान गाडीखाली येणे आणि राजकीय वैरी संपवणे यातला फरक जनतेला चांगलाच समजतो!! गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी आज तुम्ही एका राजकीय गुन्ह्याला एका मुक्या प्राण्याच्या अपघाताचे उदाहरण देत तुच्छ लेखू पाहत आहात का? तुमच्या हातात असलेली गृह खात्याची व्यवस्था निष्क्रिय ठरत आहे, की तुम्हीच या व्यवस्थेचे हात पाय लुळे करून हिला निष्क्रिय केले आहे, याचे उत्तर देणे हेच तुमचे कर्तव्य. महाराष्ट्र हा छत्रपतींच्या स्वराज्यासाठी ओळखला जातो, शासनासाठी ओळखला जातो, या राज्याला आम्ही गुंडगिरीचा खुला मंच होऊ देणार नाही. ज्यांना सत्ता सांभाळता येत नाही, सुव्यवस्था टिकवता येत नाही, अशांची महाराष्ट्रातील जनतेला काहीच गरज नाही. तुम्ही राजीनामा द्यायलाच पाहिजे गृहमंत्री”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.




























































