Live – सध्या फक्त ओरबडणं सुरुय, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या अधिवेशनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत आहेत. वाचा त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे –

  • कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळी आहेत: धर्माचा ध्वज हा ज्यावेळेला अडाण्याचा हाती जातो त्यावेळी त्या ध्वजावरून रक्ताचे थेंब ओघळतात. ते रक्त असत त्या धर्माचंच! आज धर्माचा ध्वज ‘अडाण्यांच्याच’ हातात गेलाय आणि बाहेर जो काही खून खराबा सुरू आहे; ते आमच्याच धर्माचं रक्त त्या अडाण्याच्या हातातील ध्वजावरनं ठिबकत आहे.
  • आपल्याकडे भाजपासारखा पैसा नाही पण सोन्यासारखी मौल्यवान, निष्ठावंत माणसे माझ्या सोबत आहेत, ही माझी संपत्ती आहे. हे माझे भांडवल आहे.
  • जो राज्यकर्ता नोकरी देऊ शकत नसेल, महागाई, गुंडागिरी थांबवू शकत नसेल, तर तो राज्यकर्ता म्हणून खुर्चीत बसण्यास नालायक आहे.
  • तुम्ही नोटबंदी कशी केली, शेतकऱ्यांवर काळा कायदा कसे आणत होता, याचीदेखील आठवण सांगा. दहा वर्षांपूर्वी डॉलरचा भाव काय होता, गॅस सिलेंडरचे, पेट्रोलचे भाव काय होते, हे सुद्धा आम्हाला सांगा.
  • नेहरूंपेक्षा जास्त काळ भारतीय जनता पक्षाने सत्ता भोगलेली आहे. त्यांनी सत्तेत असताना काय केलंय, याचा आढावा कोण घेणार?
  • महाराष्ट्राला त्याच्या हक्काचा पैसे हवाय! केंद्रात सरकार आल्यानंतर याकरिता आम्ही आग्रह केल्याशिवाय राहणार नाही.
  • मोदी गॅरंटीमध्ये बराचसा पैसा माझ्या महाराष्ट्राच्या कष्टाचा आहे.
  • आता महाराष्ट्राला एकूण कराच्या किमान 50 टक्के महाराष्ट्राला मिळालेच पाहिजेत.
  • महाराष्ट्र जेव्हा केंद्राला कर म्हणून 1 रुपया देतो तेव्हा महाराष्ट्राला केवळ 7 पैसे केंद्राकडून मिळतात. बाकीचे पैसे जातात कुठे?
  • स्थानीय लोकाधिकार समितीतील कार्यकर्त्यांनी त्या काळात तरुण वयात हातात धरलेला भगवा निवृत्तीनंतरही सोडला नाही, ह्यालाच निष्ठा म्हणतात.
  • ज्याच्यावर टीका करतोय त्याला कळलं पाहिजे, त्याचं नेमकं काय चुकतंय. सध्या फक्त ओरबडणं सुरू आहे.