वागळेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज पत्रकारांची निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यात राष्ट्र सेवा दलाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘निर्भय बनो’ सभेला जात असताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. पाठलाग करून अर्ध्या तासात चार वेळा दगड, लाठय़ा-काठय़ा, हॉकी स्टिक, लोखंडी रॉड यांच्या साहाय्याने प्राणघातक हल्ला करत वागळे यांच्या गाडीला लक्ष्य करण्यात आले. हा हल्ला पूर्वनियोजित आणि पोलिसांच्या सहमतीने झाल्याचा आरोप होत आहे. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईतील विविध पत्रकार संघटना उद्या सोमवार, 12 फेब्रुवारीला संध्याकाळी 6.30 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ येथे निदर्शने करणार आहेत. सर्व पत्रकारांनी या निदर्शनात उपस्थित राहावे, असे आवाहन राज्यभरातील पत्रकार संघटनांकडून करण्यात आले आहे.