
टीम इंडिया व इंग्लंडमध्ये चौथा कसोटी सामना रांची येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडकडून टीम इंडियाला विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य देण्यात आले आहे. त्यातल्या 40 धावा टीम इंडियाने केल्या असून चौथ्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 152 धावा करायच्या आहेत.
🔊 Hear this! Rohit does not want Sarfaraz to be a hero?🤔#INDvsENG #IDFCFirstBankTestSeries #BazBowled #JioCinemaSports pic.twitter.com/ZtIsnEZM67
— JioCinema (@JioCinema) February 25, 2024
तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी करत इंग्लंडचा डाव 145 धावांवर रोखला. यावेळी क्षेत्ररक्षण करताना नवोदित खेळाडू सरफराज खान हा हेल्मेट व पॅड न घालता गली पॉईंटला उभं राहायला निघाला होता. त्यावर कर्णधार रोहीत शर्माने त्याला अडवलं व “ए भाय, ज्यादा हिरो नहीं बनने का, हेल्मेट पेहेन”, असे सांगितले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. .


























































