आरजेडीच्या आमदार किरण देवी यांच्या घरावर ईडीचे छापे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी राष्ट्रीय जनता दलाच्या आमदार किरण देवी, त्यांचे पती आणि माजी आमदार अरुण यादव यांच्या आगियाव येथील निवासस्थानावर छापे टाकले आहेत. ईडीचे अधिकारी किरण देवी यांच्या निवासस्थानी पोहोचले, तेव्हा दोघेही पती-पत्नी आमदार तेथे नव्हते, या छापेमारीत कागदपत्रांची तपासणी सुरु आहे.

किरण देवी यांचे पती अरुण यादव माजी आमदार असून ते वाळूचे मोठे व्यावसायिक आहेत.ईडीची टीम मोठ्या संख्येने पोलीस अधिकाऱ्यांसह उपस्थित आहे आणि चौकशी करत आहेत. ईडीची 10 सदस्यीय टीम किरण देवी यांच्या घरात चौकशी करत आहे.

आरा व्यतिरिक्त पाटणा येथील रंजन पथ येथील एका अपार्टमेंटमध्ये असलेल्या 5 फ्लॅटवरही छापे टाकण्यात आले आहेत. ज्यामध्ये त्याच्या कंपनीची कार्यालये आहेत. याआधी गेल्या वर्षी 16 मे रोजी सीबीआयने आरजेडी आमदार किरण देवी आणि त्यांचे पती अरुण यादव यांच्या वडिलोपार्जित घरासह अनेक ठिकाणी छापे टाकले होते. दिल्ली-गुरुग्रामसह अनेक ठिकाणी सीबीआयचे छापे टाकण्यात आले. लँड फॉर जॉबशी संबंधित  हा छापा टाकला होता.