निधीचा दुष्काळ, अर्थसंकल्पात गोलमाल, कंत्राटदार मालामाल; विरोधकांचे विधान भवनाच्या पायऱयांवर आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याची तिजोरी लुटणाऱया सरकारविरोधात विरोधकांनी आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही विधान भवनाच्या पायऱयांवर जोरदार निषेध आंदोलन केले. ‘अर्थसंकल्पात गोलमाल, कंत्राटदार मालामाल’, ‘सत्ताधारी आमदार तुपाशी, जनता उपाशी’, ‘पीक विमा कंपन्या जोमात, शेतकरी कोमात’, ‘विक्रमी पुरवणी मागण्या, आमदार पह्डण्यासाठी आणि पह्डलेले सांभाळण्यासाठी’ अशा आशयाचे फलक हातात घेऊन विरोधकांनी आंदोलन केले.

‘‘महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर, शेतकऱयांवर अन्याय आणि कामगारांच्या तोंडाला पाने पुसणाऱया, जुनी पेन्शनबाबत खोटे आश्वासन, दुष्काळसदृश स्थितीत पाणी न देणाऱया सरकारचा धिक्कार असो,’’ अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक सरकार करत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला. आंदोलनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, सतेज बंटी पाटील, अभिजीत वंजारी, नितीन राऊत, विकास ठाकरे, संग्राम थोपटे, सुरेश वरपुडकर, प्रतिभा धानोरकर, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिन अहिर, रमेश कोरगावकर, विलास पोतनीस, सुनील शिंदे, राजन साळवी, राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) रोहित पवार, सुनील भुसारा आंदोलनात सहभागी झाले होते.