
आम्हाला मेळाव्याला येणे शक्य नसल्याचे कारण देऊन बारामतीतील व्यापाऱयांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नियोजित मिळावा आज अचानक व्यापाऱयांनी रद्द केला. तशा स्वरूपाचे पत्र शरद पवार यांना दिले. हा मेळावा रद्द करण्यासाठी व्यापाऱयांवर ‘बडय़ा नेत्याने’ दबाव टाकल्याची चर्चा बारामतीमधील व्यापारी वर्गात होती. शरद पवार यांनी ती जाहीरपणे बोलून दाखवली.
बारामती मतदारसंघात आज होलार समाज, व्यापारी, बारामती, दौंड, इंदापूर तालुक्यातील वकील आणि बारामतीतील वैद्यकीय व्यावसायिकांचा असे चार मेळावे शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते. त्यापैकी व्यापाऱयांनी मेळावा रद्द केल्याची माहिती शरद पवार यांनीच वकिलांच्या मेळाव्यात दिली.
पवार म्हणाले, बारामतीतील व्यापाऱयांचे प्रश्न मी नेहमी सोडवतो. आज व्यापाऱयांबरोबर माझी चर्चा होती. मात्र, अचानक मेळावा रद्द करण्यासंबंधीचे पत्र मला त्यांच्याकडून मिळाले. गेल्या पन्नास वर्षात असं कधी घडलं नव्हतं. मला माहीत नाही, बारामतीतील व्यापाऱयांना कशाची चिंता वाटते.
मी अनेक वेळा व्यापाऱयांशी त्यांच्या प्रश्नांसाठी अडचणींसाठी चर्चा केली; परंतु गेल्या पन्नास वर्षात ‘आम्हाला जमणार नाही’ असं त्यांनी कधीच कळवलं.























































