केशव हारुगडे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केशव रामचंद्र हारुगडे यांचे नुकतेच राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दैनिक सामनाच्या कला विभागातील सिनिअर आर्टिस्ट भगवान हारुगडे यांचे ते वडील होते. त्यांचे बारावे कार्य 19 मार्चला त्यांच्या कोल्हापूरमधील शाहुवाडी तालुक्यातील हारुगडेवाडी या मूळ गावी केले जाणार आहे.