
उपांत्यपूर्व फेरीपासून मुंबईसाठी खेळत असलेल्या मुशीर खानने गेल्या 3 सामन्यातील चार डावात ना. 203, 33, 55 आणि 6 धावा केल्या होत्या, पण आज त्याची बॅट पुन्हा तळपली. त्याने कसोटी क्रिकेटला साजेशी नांगरधारी फलंदाजी करताना आठ तास विदर्भच्या गोलंदाजांना झुंजवत 326 चेंडूंत 136 धावांची धीरोदात्त खेळी केली. विशेष म्हणजे त्याने अजिंक्य रहाणेसोबत 130 धावांची तर श्रेयस अय्यरबरोबर 168 धावांची भागी रचली.






























































